उस्मानाबाद: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान घातले होते. मात्र आता परिस्थिती काहीशी बदलताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंतेत वाढ झाली होती मात्र आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कोरोनाला हाकलून देणं सुरु झालं आहे. जिल्ह्यातील एकूण २७७ गावांमधून कोरोनाला हाकलून देण्यात यश आलं आहे.
जिल्ह्यातील २७७ गावांमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. तर केवळ चार रुग्ण असणारी गावे २९७ आहेत.
जिल्ह्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १५२ गावे कोरोनाने घेरलेली होती. यामध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण होते तर तितक्याच गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण होते.
या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यात जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले. याचा परिणाम दिसून आला असून पॉझिटिव्हिटी रेट ३१ वरून १८ टक्क्यांवर घसरला आहे. यामध्ये शून्य ॲक्टिव्ह रुग्णसंख्या असलेली गावे २७७ आहेत तर एक ते चार रुग्णसंख्या असणारी गावे २९७ आहेत. पाच ते नऊ एक संख्या असणारी गावे १२४, दहापेक्षा अधिक रुग्ण संख्या असलेली गावे ११९ आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी टप्पा तीन राबविल्यामुळे लक्षणे असणारे कोरोना रुग्ण सापडून संसर्गाचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करणे योग्य नाही; चंद्रकांत पाटलांच विरोधकांना प्रत्युत्तर
- गोरगरीब जनतेची चिंता मिटणार, आता एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या जवळचे शिवभोजन थाळी केंद्र
- लसींच्या तुटवड्याला केंद्र सरकारचा भोंगळ कारभारच जबाबदार ? सीरमच्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप !
- एस. एस. राजामौलीच्या आरआरआरची प्रदर्शनापुर्वीच बक्कळ कमाई; इतक्या कोटीत विकले गेले सॅटेलाईट हक्क
- ‘चक्री वादळाला लाजवेल असा दौऱ्याचा वेग होता’, मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

