🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे पहिल्या व दुसऱ्या लाटे दरम्यान सांगितले जात होते. आता संभाव्य तिसर्या लाटेत बालकांना धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण आजपर्यंतची आकडेवारी पाहता तरुणांनाच कोरोनाचा अधिक संसर्ग झाला आहे. त्याची टक्केवारी ६०.८७ टक्के एवढी नोंदवली गेली आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणारे तरुण शहरात कोरोना संसर्गाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
कोरोनाच्या पहिला लाटेत मार्च २०२० पासून शहरातील तरुण मोठ्या संख्येने बाधित आढळून आले. दुसऱ्या लाटेतही हेच चित्र पाहायला मिळाले. नोकरी-व्यवसाय, खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या तरुणांना कोरोनाची बाधा होत आहे. महापालिकेने गुरुवारी दिलेल्या अहवालानुसार शहरात आत्तापर्यंत ८४ हजार ९२१ कोरोना रुग्ण आढळून आले.
त्यातील ५१ हजार ६९८ रुग्ण अठरा ते पन्नास वर्षे वयोगटातील आहेत. तिसरी लाट बालकांसाठी धोक्याची मानली जात असली तरीही पहिल्या दोन लाटेत बालकांना संसर्ग कमी प्रमाणात झाला. ५ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांचे प्रमाण ९.५ टक्के आणि ० ते ५ वयोगटातील बाधित बालकांचे प्रमाण ९.०५ टक्के एवढे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तरुणच घराघरात कोरोनाचा फैलाव करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
शासनाने हाती घेतलेली कोरोना लसीकरण मोहीम लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. मात्र औरंगाबादेतच नव्हे तर संपूर्ण देशभरात संभाव्य तिसरी लाट रोखायची असेल किंवा तिचा प्रभाव कमी करण्यासाठी १८ ते ५० वयोगटातील तरुणांच्या लसीकरणावर भर द्यायला हवा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. संभाव्य तिसर्या लाटेपर्यंत आपण जेवढ्या अधिक प्रमाणत तरुणांचे लसीकरण करू शकू, तेवढ्या अधिक प्रमाणत तिसर्या लाटेचा जोर कमी करता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करणे योग्य नाही; चंद्रकांत पाटलांच विरोधकांना प्रत्युत्तर
- गोरगरीब जनतेची चिंता मिटणार, आता एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या जवळचे शिवभोजन थाळी केंद्र
- लसींच्या तुटवड्याला केंद्र सरकारचा भोंगळ कारभारच जबाबदार ? सीरमच्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप !
- एस. एस. राजामौलीच्या आरआरआरची प्रदर्शनापुर्वीच बक्कळ कमाई; इतक्या कोटीत विकले गेले सॅटेलाईट हक्क
- ‘चक्री वादळाला लाजवेल असा दौऱ्याचा वेग होता’, मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

