Share

एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करणे योग्य नाही; चंद्रकांत पाटलांच विरोधकांना प्रत्युत्तर

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. कोरोनाशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका देखील फुटला.

मात्र, यानंतर आता विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींवर होणाऱ्या बोचऱ्या टीकांनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या भावनांची चेष्टा करणे हे भारताच्या राजकारणात शोभत नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.

‘राजकारणाची पातळी खालावली आहे. या देशात काही परंपरा आहेत. एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करायची योग्य नाही. पण मोदींना त्याने काही फरक पडत नाही,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यासोबतच, मोदींनी महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही, असं सांगतानाच मोदींनी तौक्ते वादळात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक राज्यातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!