Share

गोरगरीब जनतेची चिंता मिटणार, आता एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या जवळचे शिवभोजन थाळी केंद्र

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आणखी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या कठीण काळात हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरिबांना भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र अनेक नागरिकांना हे शिवभोजन थाळी केंद्र कुठे आहे हेच माहिती नसल्याने अनेकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

दरम्यान, आता सर्वसामान्यांची होणारी हीच गैरसोय आता दूर होणार असून एका क्लिकवर आपल्या जवळच्या शिवभोजन थाळी केंद्राचा पत्ता तुम्हाला उपलब्ध होणार आहे. http://mahaepos.gov.in/Eatery_plate_limit_abstarct.jsp  या लिंक वर क्लिक करून तुमच्या जवळचे शिवभोजन थाळी केंद्र माहिती पडणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या सुविधेचा लाभ घेवू शकता. उल्लेखनीय बाब म्हणजे या लिंकवर क्लिक केल्यावर जी वेबसाईट ओपन होईल त्यावर तुम्हाला तुम्हाला हव्या असलेल्या केंद्रावर किती थाळ्या उपलब्ध आहेत याची देखील माहिती मिळणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याततील विविध समाज घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक १४ जूनपर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे १५ एप्रिल ते २० मे पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!