Share

हॉटेलमध्ये बसून मद्यपान करणाऱ्यासह मालकावर कारवाई

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : हॉटेलवर छापा मारुन पोलिसांनी मद्यपींसह चालकावर कारवाई केली. ही कारवाई १२ मार्च रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मुकुंदवाडीतील एसटी वर्कशॉपसमोर करण्यात आली. पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे हॉटेल मालकासह हॉटेलमध्ये बसून मद्यपान करणाNया ग्राहकात खळबळ उडाली आहे.

न्यू हॉटेल बंजारा सवईमध्ये हॉटेल चालक राजपाल रघुनाथ चव्हाण याने ग्राहकांना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. त्यावरुन पोलिसांनी छापा मारत चालक चव्हाणसह ग्राहक प्रशांत भाऊराव खरात, चंद्रकांत ओंकार हिवराळे, सुनील पांडूरंग कांगाणे, संतोष पोपटराव बोराडे यांना पकडले. त्यांच्याविरुध्द एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत देशी दारुची अवैध विक्री करणा-या तरुणाा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दीड हजारांची देशी दारु पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई १२ मार्च रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास पंढरपूरच्या मच्छी मार्केटमध्ये करण्यात आली. रमेश नामदेव चव्हाण (वय १९, रा. अन्सार कॉलनी, ह. मु. पंढरपूर) असे अवैध दारु विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्याविरुध्द एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!