नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकायांच्यात ४ मार्च पासून पाहिला कासोटी सामना खेळवला जाणार आहे. त्या सामन्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडाने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोघे मिळून या सामन्यात १४ पेक्षा अधिक विकेट घेतील.
“त्यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेल वर एक व्हीडीओ शेअर करत ही भविष्यवाणी केली आहे. ते या व्हीडीओमध्ये म्हणाले कि, मला वाटते की जडेजा आणि अश्विन मिळून या सामन्यात १४ पेक्षा अधिक विकेट्स घेतील. परंतु पाहण्यासारखी हि गोष्ट आहे की अश्विन सध्या फिट नाही, हि मोठी अडचण आहे. कारण तो खेळेल की नाही हेही अजून फिक्स झालेले नाही.
पुढे ते म्हणाले की, जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करेल. भारतात प्रत्येक वेळी असं होत की जो संघ नाणेफेक जिंकतो तोच प्रथम फलंदाजी करतो. तर भारतीय सलामीवीर श्रीलंका सलामीवीरापेक्षा जास्त धावा करतील.”
त्यातच हा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी त्याच्या कारकिर्दीतील महत्वाचा सामना असणार आहे. कारण हा सामना त्याचा १०० बा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच जबरदस्त होणार यात शंकाच नाही. त्यातच बीसीसीआयने या विशेष सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडीयममध्ये उपस्थितीसाठी परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

