Share

State Budget Session 2022 : यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल- अजित पवार

Published On: 

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू झाले आहेत. मात्र पहिलाच दिवस घोषणा आणि गोंधळानी सुरु झाला आहे. भाजप नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यावरच आंदोलन करण्यात येत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल अशी ग्वाही दिली आहे.

“आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल. महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देतो.”, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.

दरम्यान आज पहिल्याच दिवशी अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात मविआ सरकारकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात ठराव आणणार असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे आजच्या अधिवेशनात त्यांचा निषेध करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!