औरंगाबाद : सोयगाव तालुक्यासह परिसरात भुईमूग काढणीच्या कामात शेतकरी शेत शिवारात व्यस्त असल्याचे दिसून येत असून, खरिपाची तयारी देखील सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
सोयगावसह परिसरात सध्या रब्बी हंगामातील भुईमूग शेंगा काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून खरिपाची लगबग देखील पहायला मिळत आहे. यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात बागायतदार शेतक-यांनी भुईमूग पिकांची पेरणी केली आहे. मजुरांच्या सहाय्याने भुईमूग शेंगांची काढणी केली जात असून, सोयगावसह परिसरात यावर्षी विहीरी व कुंपनलिकांची भुजल पातळी चांगली असल्याने रब्बी हंगामातील भुईमूग पिकांचे क्षेत्रफळही वाढले आहे. परिसरात सध्या भुईमूग शेंगा काढणीचे काम करतांना मजुरवर्ग मोठ्या प्रमाणावर शेतशिवरात दिसत असून यामुळे मजुरांनाही ताळेबंदीच्या काळात रोजगार उपलब्ध होत आहे.
तसेच शेतकरी आपल्याकडे असलेल्या जनावरांना पावसाळ्यात चाऱ्याची कमतरता जाणवू नये यासाठी भुईमूग पिकापासून मिळणारा पाला जनावरांना चारा म्हणून साठवून ठेवण्याचे नियोजन करत आहे. यावर्षी बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता शेतक-यांनी व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करुन अपेक्षित भाव न मिळाल्याने देखील शेतकरी नाराज आहे.
सोयगावसह परिसरातील कंकराळा, जरंडी, बहुलखेडा, घोसला, किन्ही, मोहळाई, सावळदबारा आदी भागातील भुईमूग चाऱ्याला परजिल्ह्यात पशुधन मालकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून दररोज चारा घेण्यासाठी परजिल्ह्यातील शेतकरी या परिसरात येत आहे. भुईमूग उत्पादक शेतक-यांना चाऱ्यापासून चांगला मोबदला मिळत असल्याने मजुरीचा खर्च निघत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका-खा.संभाजीराजे


