Share

‘माझ्यावरील आरोप जर सिद्ध झाले तर मी लोकांसमोर फासावर जाईन’

Published On: 

कोलकाता – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात समन्स पाठवले आहे. याशिवाय बंगाल सीआयडीचे एडीजी ज्ञानवंत सिंग आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे.

दरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे.नोव्हेंबरमध्ये जाहीर सभेत जे मी बोललो होतो त्याचा पुनरुच्चार करत आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात माझा 10 पैशांचाही संबंध असल्याचं सिद्ध करू शकले तर ईडी किंवा सीबीआय चौकशीची गरज नाही. मी स्वत: सर्वांसमोर फाशी घेईन असं म्हटलं आहे.

ते म्हणाले, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. पण ते गोष्टी सार्वजनिक का करत नाही आहेत? कोलकातामधील प्रकरणासाठी मला दिल्लीत हजर राहण्याचं समन्स दिलं आहे असा संताप अभिषेक यांनी व्यक्त केला. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा उल्लेख न करता भाजपा नेत्याचं नाव नारदा लाच प्रकरणी दाखल चार्जशीटमध्ये का नाही? असा सवाल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!