जालना : पाणीपट्टी न भरता पाणी वापरण्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. पण, धरणातून तब्बल सहा वर्ष पाणी उपसा करण्याची घटना जालना येथे घडली आहे. भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातून पाणीपट्टी न भरताच गेल्या ६ वर्षांपासून सर्रासपणे पाणी उपसा केला जात आहे. रामेश्वर कारखान्यासह भोकरदन नगरपालिका तसेच परिसरातील १९ ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचे ७०२७८१४ रुपये थकवले आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने या सर्वांना नोटीस बजावली आहे.
दानापूर येथील जुई धरण मध्यम प्रकल्प असून १ लाख १० हजार ८४५ नागरिकांची तहान भागवतो. भोकरदन शहरासह परिसरातील १९ गावाना येथून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी पाटबंधारे विभाग पाणीपट्टी आकारते. ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्यांकडून ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी रक्कम वसूल करते. मात्र ग्रामपंचायतीकडून पाटबंधारे विभाग पाणीपट्टीची वसुली का करत नाही. शिवाय एक दोन नव्हे तर पाच वर्ष थकबाकी न भरता सुद्धा त्यांचा पाणीपुरवठा कसा सुरु राहताे, असा सवाल विचारला जात आहे.
भोकरदन, वाकडी ग्रामपंचायत, विरेगाव, तळणी, सुरंगळी, सिपोरा, मनापूर, मालेगाव, कठोरा, देहेड, भायडी, दानापूर, पिपळगाव रेणुकाई, मलकापूर, बाभुळगाव, करजगाव, कल्याणी, वरुड या ग्रामपंचायतीकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी लवकरच मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दानापूर येथील जुई धरणात मुबलक जलसाठा असून याच धरणातून परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूलाही कोरोनाची लागण
- BCCIचा मोठा निर्णय : ‘तो’ वादग्रस्त नियम बीसीसीआयने हटवला
- आज भारत-इंग्लंड दरम्यान निर्णायक वनडे सामना
- परभणी जिल्ह्यात सात दिवसात 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू
- ‘क्रुणाल पांड्या भारतीय संघाचा पाचवा बोलर होऊ शकत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

