पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडच्या संघाने ६ गडी राखुन पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना रन्सची खिरापत वाटली.
या सामन्यात जवळपास भारताचे सर्वच गोलंदाज अयशस्वी झाले. मात्र यात प्रथम क्रमांक होता फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवचा. या सामन्यात कुलदीपची इतकी धुलाई झाली की त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोदंवीला गेला आहे. या सामन्यात कुलदीप यादवने १० षटकात ८४ धावा दिल्या आणि या बदल्यात एकही गडी बाद केला नाही. कुलदीपने १० षटकांत तब्बल ८ षटकार दिले.
या मॅचमध्ये भारताला सहाव्या गोलंदाजाची कमी जाणवली. संघात हार्दिक पांड्याचा पर्याय होता, परंतु विराट कोहलीने त्याचा उपयोग केला नाही. क्रुणालच्या फलंदाजीवर अनेकांनी स्तुतीसुमने उधळली पण त्याच्या खराब बोलिंगने त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स झाकला गेला. या सगळ्यावर भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.
संघात पाचवा बोलर्स कधीच पर्याय म्हणून खेळू शकत नाही. भारतीय संघाची बोलिंग कमजोर दिसली कारण क्रुणाल पांड्या भारतीय संघाचा पाचवा बोलर होऊ शकत नाही. तो 10 ओव्हर्स फेकू शकेल, अशा बोलर नाहीय. अशा पीचवर संघाला युजेवेंद्र चहलसारखा बोलर हवा जो 10 ओव्हर्स फेकू शकेल. पांड्या ब्रदर्स 10 ओव्हर्स फेकू शकतात परंतु भारतीय संघाला जर मालिकेतला अंतिम सामना जिंकायचा असेल तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बोलर्सचा विचार संघाला करावाच लागेल, असं गावस्कर यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूलाही कोरोनाची लागण
- BCCIचा मोठा निर्णय : ‘तो’ वादग्रस्त नियम बीसीसीआयने हटवला
- आज भारत-इंग्लंड दरम्यान निर्णायक वनडे सामना
- परभणी जिल्ह्यात सात दिवसात 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू
- शहर अभियंत्याला माहिती आयुक्त यांनी ठोकला पाच हजारांचा दंड

