Share

अबब! लातूर महावितरणचे थकले तब्बल साडे सहा हजार कोटी रुपये

Published On: 

लातूर: राज्यात सध्या थकीत वीजबिलावरून विरोधक आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्यातच आता धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. महावितरणच्या लातूर परिमंडळात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व कृषी वर्गवारीतील ग्राहकांकडे तब्बल महावितरणचे ६ हजार ५६७ कोटी रुपये थकले आहेत. मागील लॉकडाऊनच्या दहा महिन्यांच्या काळात ग्राहकांनी विजेचे बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकीत वाढ झाली.

वाढत्या थकबाकीमुळे महावितरणच्या आर्थिक संकटात वाढ झाल्याने वसुलीशिवाय पर्याय राहिला नाही. या पार्श्वभूमीवर महावितरण मुख्यालयाने वाणिज्य विभागाचे संचालक सतीश चव्हाण आणि मुख्य महाव्यवस्थापक भरत जाडकर यांच्या विषेश पथकाची रवानगी लातूर परिमंडळात केली आहे. एक तर विजेचे पैसे भरा, अन्यथा वीज जोडण्या खंडित करा असाच पवित्रा महावितरणतर्फे घेण्यात आलेला आहे.

येत्या काही दिवसात पालकमंत्री लातूरच्या दौरा असल्यामुळे येणाऱ्या काळात थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईचा आढावा घेवून कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येऊ शकते. थेट मुख्यालय स्तरावरुन वीज जोड तोडणीची खातरजमा केली जात असल्याने महावितरणची स्थानिक यंत्रणा विजेच्या जोडण्या खंडित करण्यास पुरती सरसावली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूरकरांना समस्येचा सामना करावा लागू शकतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!