परभणी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखावा म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी (दि.24) सायंकाळी सात वाजल्यापासून ते 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करत असल्याचा आदेश सोमवारी रात्री जारी करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव खुप मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनाची वाढणारी साखळी तुटावी म्हणून उपाययोजनांचा एक भाग म्हणून बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून ते 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेशात जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले आहे. फेब्रुवारीपासून रुग्ण संख्या कमी प्रमाणात वाढत होती. परंतू मार्च महिन्याच्या सुरुवातीला खुप मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालये, क्रीडागणांसह अनेक अस्थापना बंद करण्यात आले आहेत.
नागरिकांनी आता स्वत: सोबतच स्वत:च्या कुटूंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये, मास्क लावून गरजेनुसार घराच्या बाहेर पडावे, सोशल डिन्टंसिंग देखील पाळणे गरजेचे आहे. तर सॅनेटायझरचा वापर देखील करणे गरजेचे आहे. तर नियमीतपणे स्वत:चे हात स्वच्छ धुवावेत असे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे आणी मास्क न घातलेले आढळल्यास प्रशासन पकडून क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचेही या वेळी जाहीर करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी
- जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती; हे मिम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही !
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- …म्हणून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पवारांची ठाम भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

