Share

पक्षांतर केल्यानंतर देखील उमेदवारीची चिंता; आठवलेंनी सुचविला भन्नाट फॉर्म्युला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी कुणाला मिळणार हा देखील सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

पक्षांतर केलेल्या उमेदवाराला सेना-भाजप उमेदवारी देईल कि नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान या नेत्यांची चिंता ओळखून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भन्नाट उपाय सुचविला आहे.

युतीमध्ये मतभेद नाहीत परंतु जागा वाटपात अडचणी आल्याच, तर युतीत प्रवेश केलेल्यांना रिपाईच्या कोट्यातून उमेदवारी देऊ असंही त्यांनी जाहीर केले आहे. तसेच विरोधकांचं मनोबल खचलं असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते.

दरम्यान, पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतून वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील नेते राणा जगजितसिंह पाटील हे पक्ष सोडणार आहेत. तसेच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!