Share

दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी पायी चालत यात्रा काढेल- आदित्य ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : तिसऱ्या टप्यातील जन आशिर्वाद यात्रा मी उत्तर महाराष्ट्रातून सुरू केली आणि त्या भागात पाऊस झाला. आताही पैठणला येण्यापुर्वी इथे पाऊस झाल्याची बातमी मिळाली. माझ्या यात्रेने महाराष्ट्रात पाऊस पडणार असेल तर दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी मी पायी यात्रा करायला तयार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण येथील विजय संकल्प मेळाव्यात बोलतांना सांगितले.

आदित्य ठाकरे यांची जन आशिर्वाद यात्रा दोन दिवसांच्या औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आली आहे. दुपारी पैठण येथे विजय संकल्प मेळाव्यात बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले, जन आशिर्वाद यात्रेत महाराष्ट्रातील जनतेकडुन भरभरुन प्रेम मिळत आहे. यात्रेच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज थेट मंत्रालय व विधानसभेत पोहचवला जाणार आहे, त्यामुळे नवा महाराष्ट्र घडेल याचा मला विश्वास आहे.

महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष यात्रा काढत आहेत. अशा यात्रा काढण्यामागे त्यांचा राजकीय हेतु आहे, मात्र जन आशिर्वाद यात्रा जनतेचे प्रश्न ऐकुन घेवुन सोडविण्यासाठी आहे. या यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षाचा व कोणत्याही जातीधर्मांचा व्यक्ती आला तरी त्याच्या अडचणी सोडविण्यात येतील. राजकारण हे निवडणूकी पुरते असते, निवडणूकीनंतर ते बाजुला ठेवुन आम्ही यात्रेत उतरलो आहोत. सत्तेत राहून सुध्दा आम्ही संघर्ष केला असुन लोकसभा आणि विधानसभेत लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सरसकट कर्जमुक्ती

सभेत आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांचे प्रश्न ऐकुन घेतले. यावेळी कर्जमुक्ती झाली का? असा सवाल करतांच उपस्थितांमधून नाही नाही असे सांगण्यात आले. यावर सरसकट कर्जमुक्ती केली जाईल असे आश्वासन दते शेतकऱ्यांनी घाबरुन जावु नये व वाईट विचार मनात आणू नेये असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!