Share

शेतात झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून

Published On: 

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथे शेतात झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीचा घाव घालून ठार केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून बुधवारी (दि.१९) ही घटना उघडकीस आली आहे. संदीप सुदाम चव्हाण (३१) असे मयत तरुणाचे नाव आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, बिल्ड येथील गायके वस्तीच्या पुढे डोंगराजवळ गट न.११० मध्ये संदीप चव्हाण यांची शेती आहे. शेतात खोपी असून संदीप जवळपास खोपिवरच मुक्कामी राहत असे. मंगळवारी देखील संदीप हा नेहमीप्रमाणेच शेतावर झोपण्यास मुक्कामी राहिला.

रात्री दीड-दोन पर्यंत मोबाईलवर ऑनलाईन होता. त्यानंतर रात्री दोननंतर अज्ञात इसमाने त्याच्या डोक्यात कु-हाडीचे चार ते पाच घाव घातल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना दिसून आली व पोलिसांना कळविण्यात आले. खुनाचे कारण समजले नसून पोलीस व गुन्हा शाखा याचा तपास करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!