Share

मुंडे-देशमुखांचा याराना आजही कायम, विलासरावांच्या पुतळ्याशेजारी उभारणार गोपीनाथरावांचा पुतळा !

Published On: 

🕒 1 min read

लातूर : विलासराव देशमुख लातूरचे, तर गोपीनाथ मुंडे बीडचे. त्याकाळी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना ‘दो हंसो का जोडा’ असे संबोधले जात असे. मैत्रीला अनुसरुन या राजकीय मित्रांचे स्मारक शेजारी शेजारी उभारण्यात येणार आहेत. लातूर जिल्हा परिषदेची काल सभा झाली. त्यात एकमुखाने हा निणर्य घेण्यात आला आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा दोस्ताना संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. जिवंतपणी दोघांनीही आपल्या मैत्रीत कधीच अंतर पडू दिलं नाही. मात्र मृत्यूनंतरही त्यांच्यात अंतर पडत नाही किंबहुना पडणार नाही कारण लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.

त्याचबरोबर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात उभा करण्यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे. लातूर जिल्हा परिषदेने दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतीभवन आणि संग्रहालयास जागा उपलब्ध करून देण्याचा एकमुखी ठराव घेतला आहे.

वेगवेगळ्या पक्षात असूनही एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे सख्खे मित्र म्हणून ते परिचित होते. ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरुवात झाली तरी विद्यार्थीदशेपासून ते एकत्र होते. महाविद्यालयीन जीवनात देशमुख-मुंडे जोडीचे किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात. दोघांचे अकाली निधन महरष्ट्राला चुटपूट लावणारे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!