मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात दिवसभरात तब्बल ७१ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मत केली आहे. तर, गेल्या १५ दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांहून अधिक होता. या आकड्यात देखील मोठी घट झाली असून आज ४८ हजार ७०० नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात आज 48700 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 71736 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3601796 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 674770 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 26, 2021
दरम्यान, राज्यात एकूण ६ लाख ७४ हजार ७७० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92% झाले आहे. गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात केली आहे. यासोबतच, आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिलासा! राज्यात विक्रमी लसीकरण, सायंकाळपर्यंत पाच लाखांचा आकडा पार
- घर का भेदी..! युवतीने मित्राच्या मदतीने घरातून चोरले २० तोळे सोने
- ‘भारताने हायड्रोक्सिक्लोरोक्विन दिले, आपण लस देऊत’, जो बायडेनवर नागरिकांचा दबाव
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- काही पण होऊ द्या, केंद्राकडे बोट दाखवणे हीच ठाकरे सरकारची ओळख’ : रावसाहेब दानवेंचा टोला


