Share

दिलासा! राज्यात विक्रमी लसीकरण, सायंकाळपर्यंत पाच लाखांचा आकडा पार

Published On: 

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सोमवारी राज्यात झालेल्या एकूण लसीकरणाचा आकडा सायंकाळी सहा वाजेपर्यंतच पाच लाखांच्यावर गेला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्य सरकार लसीकरणावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आली आहे. लसीकरणाची वाढती आकडेवारी निश्चितच दिलासा देणारी आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज आतावरची विक्रमी नोंद केली असून सायं. ६ पर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरच आपण दीड कोटींचा टप्पा गाठू. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.’

राज्यातील आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र कोरोना रुग्णांसाठी राबत आहे. त्यातच लसीकरणाचा ताणही आरोग्य यंत्रणेवरच आहे. त्यामुळे या दोन्हींची सांगड घालत राज्यात लसीकरण सुरू आहे. सुरूवातीला लस उपलब्ध होण्यासाठी काही अडचणी आल्या होत्या. मात्र, आता लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरणाने वेग घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या      

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!