Share

काही पण होऊ द्या, केंद्राकडे बोट दाखवणे हीच ठाकरे सरकारची ओळख’ : रावसाहेब दानवेंचा टोला

Published On: 

औरंगाबाद : कुठले ही संकट आले कि, केंद्र सरकारकडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणे, ही आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली असल्याचा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लगावला आहे. कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे.

आता जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नाही, तेव्हा महाराष्ट्र सरकार त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकार वर दोषारोप सुरू केले असल्याचेही दिल्ली येथे आरोप केला आहे. भारत सरकारकडून सर्व राज्यांमधील सार्वजनिक आरोग्य सुविधा स्थापन करण्यासाठी १६२  प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची मंजुरी जानेवारी २०२१ मध्येच दिली होती. मंजूर केलेल्या १६२ प्लांटमधून अश्या १० प्लांट्सच्या इंस्टॉलेशनची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली होती. पण महाराष्ट्र सरकारने या दिशेने कोणते ही कठोर पाऊले उचललेली दिसत नसल्याचेही दानवे यांनी या वेळी सांगितले.

जानेवारी २०२१ ला ही मंजुरी दिलेली आहे. या विषयावर युद्ध पातळीवर जर काम केले असते तर आज कोरानाची परिस्थिती वेगळी दिसली असती. इतकेच नाही तर, या योजनेचा संपुर्ण खर्च केंद्र सरकार लावणार असल्याचेही दानवेंनी या वेळी सांगितले. त्यासोबत यामध्ये ७ वर्षांसाठी लागणारा देखभालीचा खर्च देखील केंद्रातील सरकार देणार आहे. परंतू महाराष्ट्र सरकारकडून असे काहीही झालेले  दिसत नाही. यातूनच महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा तसेच बेजवाबदारपणा यातुन स्पष्टपणे दिसून येत असल्याची टीका देखील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या      

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!