नवी दिल्ली : अमेरिकेच्या गोदामांत ॲस्ट्राझेनेकाचे ४ कोटी डोस पडून आहेत. भारताला कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा न करणाऱ्या अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनावर स्थानिक नागरिक चांगलेच संतापलेत. या प्रकरणी विरोधकांसह सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्य व समर्थकांनी बायडेनविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. भारताने संकट काळात अमेरिकेला ‘हायड्रोक्सिक्लोरोक्विन’ची निर्यात केली होती. त्यामुळे आता अमेरिकेनेही आपल्याकडील अतिरिक्त लसींचा साठा भारताला पाठवून त्याची मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी जो बायडेन प्रशासनाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या देशांना ‘ॲस्ट्राझेनेका’ लसीचे राखीव डोस पाठवण्याची विनंती केली आहे. भारत व अन्य देशांतील लोकांना मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे आपण आपल्या लसी गोदामांत ठेवू शकत नाही. आपल्याला त्या गरज असलेल्या देशांना पाठवाव्या लागतील, असे ते म्हणालेत.
‘ब्रुकिंग्स इ्स्टिटट्यूट’च्या तन्वी मदान यांनीही एका ट्विटद्वारे बायडेन प्रशासनावर शरसंधान साधले आहे. बायडेन प्रशासन गत काही महिन्यांत मिळालेली आपली प्रतिष्ठा गमावत आहे. आपल्या सरकारने काहीतरी करण्याची गरज आहे. न्यूयॉर्क व अमेरिकेच्या अन्य भागांत गतवर्षीच्या अखेरीस आपत्कालीन स्थिती निर्माण झाली होती तेव्हा भारताने देशांतर्गत टीका सहन करत आपल्याला ‘हायड्रोक्सिक्लोरोक्विन’चा पुरवठा केला होता. आपण ही गोष्ट विसरू नये, असे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरून अमरावतीची बदनामी करू नका, आरोग्य विभागाचे आवाहन
- घर का भेदी..! युवतीने मित्राच्या मदतीने घरातून चोरले २० तोळे सोने
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

