मुंबई : प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. प्रार्थनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे प्रार्थना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकताच प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती एका सोफ्यावर बसून कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिले की, भेटा माझ्या घरातील नव्या पाहुण्याला…, तिचा हा छोटा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पाळीव कुत्रा आहे.
https://www.instagram.com/p/CfyWpxuANL7/
प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या व्हिडीओच्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


