Share

Sri Lanka crisis : श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांच्या घरात सापडले लाखो रुपये; आंदोलकांचा दावा

Published On: 

नवी दिल्ली: आर्थिक संकटात असणाऱ्या श्रीलंकेत हजारो संतप्त नागरिक अध्यक्ष गोताबया राजपक्षे (President Gotabhaya Rajapaksa) यांच्या राजीनाम्यांची मागणी करीत त्यांच्या निवासस्थानी घुसले. तर आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे (Prime Minister Ranil Wickremesinghe) यांच्या खासगी मालकीच्या घराला आगही लावली आहे. श्रीलंकेतील सरकारविरोधातील हे सर्वात मोठे आंदोलन ठरले आहे. त्यातच श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या घरात लाखो रुपये सापडल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

याबाबत सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये आंदोलक राजपक्षे यांच्या निवासस्थानी पैसे मोजत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त डेली मिररने दिले आहे व सर्व पैसे सुरक्षा यंत्रणेकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी रात्री राजीनामा देण्याची घोषणा केली. तर अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आंदोलकांच्या भीतीने घरातून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंका सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहे.  परकीय चलन टंचाई , इंधन, अन्नधान्य आणि औषधांच्या आयातीवर मर्यादा आली असून सरकार आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!