मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील वाहनात जिलेटिनच्या कांड्या आढळल्याच्या संदर्भात अटक केलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ७ एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात असणार आहेत. यापूर्वी सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली होती. जी ३ एप्रिल नंतरपर्यंत वाढवण्यात आली होती. एनआयएने १३ मार्चला सचिन वाझे यांना अटक केली होती.
आता सचिन वाझेंना ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर आज सचिन वाझे एनआयए कोर्टापुढे हजर झाले. सचिन वाझेंना हदय रोगाचा आजार असल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आले होते.
रविवारी स्ट्रोक आल्याची कोर्टाला त्यांनी स्वत:हून माहिती दिली. यावर वाझेंना योग्य ते उपचार मिळत आहेत, असा दावा एनआयएनं केला. ताब्यात घेतल्यापासून दोनदा 2D eco, ब्लड टेस्ट करण्यात आल्याची माहिती कोर्टाला NIAनं दिली. त्यावर केवळ 2D eco पुरेसं नाही, अँजिओग्राफीची गरज असल्याचा दावा वाझेंच्या वकिलांनी केला आहे.
दरम्यान,अँटिलीया प्रकरणात चौकशीसाठी एनआयए सचिन वाझे यांच्यासमवेत मिठी नदीवर गेली होती. एनआयएला नदीतून नंबर प्लेट आणि डीव्हीआय यासह अनेक पुरावे सापडले आहेत. डीव्हीआर नष्ट करुन तो नदीत फेकला गेल्याचा संशय आहे. नदीतून दोन सीपीयू आणि एक हार्ड डिस्क डायव्हर्स सापडले आहेत. दोन नंबर प्लेट्स सापडल्या असून दोन्हींवर एकच नंबर लिहिलेला आहेत यामुळे देखील वाझे यांच्या अडचणी वाढणार आहेत अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान शहीद
- मोठी बातमी : सरकारच ठरल ! महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी होणार लॉकडाऊन ?
- एक पैसाही राज्य सरकारनं नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही; फडणवीसांचा घणाघात
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- मोठी बातमी : सरकारच ठरल ! महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी होणार लॉकडाऊन ?


