Share

ममता बनर्जींच्या पत्राबाबद लवकरच होणार बैठक; शरद पवारांचा खुलासा

Published On: 

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह गैरभाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिले आहे. या पत्रातून “तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे भाजपविरोधात एकत्र या”, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

याबाबद ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पत्रं लिहिलं आहे. पवारांनीही ममता बॅनर्जी यांचं पत्रं मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. या पत्रानंतर आम्ही लवकरच एक बैठक घेणार आहोत. ही बैठक दिल्ली किंवा मुंबई दोन्हीपैकी एका ठिकाणी होईल. बैठकीची तारीख अजून निश्चित नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोळसा घोटाळा आणि पशू तस्करी प्रकरणात ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची सीबीआय आणि ईडीने चौकशी केली आहे. त्यामुळे ममतादीदींच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रातही गैर भाजप पक्षातील नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“देशातील लोकशाही धोक्यात आहे, भाजपविरोधात एकत्र या”- ममता बनर्जींचे मुख्यमंत्र्यांना पत्रं

भाजप-सेना युती होणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल…”

IPL 2022 : भावानंच काढला भावाचा काटा..! मग हार्दिकच्या पत्नीनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन; पाहा VIDEO

एखादी सावळी अभिनेत्री सांगा, जी सुपरस्टार असेल” नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील वर्णभेदावर निशाणा

“बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी…”, यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!