Share

एखादी सावळी अभिनेत्री सांगा, जी सुपरस्टार असेल” नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील वर्णभेदावर निशाणा

Published On: 

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमधल्या वर्णभेदावर निशाणा साधला आहे. बॉलिवूडमधील वर्णद्वेष आणि घराणेशाही हे तसे जुने मुद्दे आहेत.कंगना रणौतसारख्या काही सेलिब्रिटींनी यावर खुलेपणानं आपलं मत मांडलं आहे, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीनने  स्पष्टपणे सांगितले की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म तर आहेच, पण त्याचसोबत वर्णभेदही आहे. या दोन गोष्टी म्हणजे बॉलिवूडचं काळं सत्य आहे, असं त्याने म्हटलंय.

एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना नवाजुद्दीन म्हणाला, “बॉलिवुडमध्ये वंशवाद आणि वर्णभेदही आहे. मला एक अशी सावळी,काळी अभिनेत्री सांगा जी सुपरस्टार किंवा स्टार आहे.”

यावेळी नवाजुद्दीनला विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाविषयीही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मी अद्याप ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिला नाही, पण मला वाटतं की मी ते पाहावं आणि नक्कीच पाहीन.” या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दोन गट पाडले का असा प्रश्न विचारण्यात आला असता तो पुढे म्हणाला, “मला हे माहीत नाही, पण प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट बनवण्याची स्वतःची एक दृष्टी असते. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपट बनवला. जेव्हा एखादा दिग्दर्शक असे चित्रपट बनवतो, तेव्हा साहजिकच त्याने तथ्य तपासलेले असतात.”

महत्वाच्या बातम्या :

“नाणारमध्ये रिफायनरी होणार नाही” – आदित्य ठाकरेंची भूमिका

विराजस–शिवानीने गुपचुप उरकले लग्न? व्हिडीओ होतोय व्हायरल  

IPL 2022 : अरेच्चा! लखनऊच्या ‘बेबी एबी’ ने केलेल्या ‘या’ विक्रमाची त्याला साधी कल्पनाही नव्हती

“विखेंना भाजपमध्ये मान मिळतो की नाही…” – छगन भुजबळांचा विखेंना टोला

“…याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?”, आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!