मुंबई : नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा सुरू आहे. मुंबईतल्या आझाद मैदानातून हा भाजपचा मोर्चा काढला आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सर्कल पर्यंत हा मोर्चा असणार आहे. नवाब मालिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी आता आक्रमक झाले आहेत.
या सभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, दलालांना डोक्यावर बसून महाराष्ट्र चालविणाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेलार यांनी दिला. तसेच नवाब मलिक यांच्या आरोपाचे आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्ही मागणी करत आहोत असेही शेलार यावेळी म्हणाले.
नवाब मालिकांकडून मंत्रीपदाचा राजीनामा घ्या, नवाब मलिक हटाव महाराष्ट्र बचाव. अशा घोषणा केल्या जात आहेत. यामध्ये भाजपच्या लोकांना नवाब मालिकांचा राजीनामा हवा आहे, कारण ते दाऊदशी जोडले गेले आहेत. त्यांच्याशी व्यवहार केले आहेत असा आरोप भाजपकडून केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

