Share

‘मूठभर उद्योजकांची सौरऊर्जा प्रकल्पावर मक्तेदारी’, आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव सध्या गगनभरारी घेत आहे. त्यातच आता सौरउर्जा प्रकल्पाची सबसिडीज केंद्र सरकार काढून घेण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

‘सौरऊर्जा निर्मिती आता मूठभर उद्योजकांची मक्तेदारी बनलीय असे ऐकतो. केंद्र सरकारने सर्व सबसिडीज काढून टाकल्यात म्हणे. सामान्य माणूस, शेतकरी, आणि पर्यावरण गेलं चुलीत’ अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान, पेट्रोलने शंभरी ओलांडून त्याचे दर १०८ रुपयापर्यंत पोहोचले आहे. तर डिझेलने सुद्धा ९७.४५ एवढा आकडा गाठला आहे. तसेच घरगुती गॅस देखील ८३४ रुपये एवढा महाग झाला आहे. अशात आता उर्जेचे भाववाढ किंवा सौरऊर्जावरील सबसिडीज काढून घेतली तर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखीन ओझे होईल हे नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!