मुंबई : सुहास शिरवळकर यांच्या समांतर या पुस्तकावर आधारीत स्वप्नील जोशी अभिनीत समांतर ही वेब सिरीज चांगलीच गाजली होती. पहिला भाग प्रदर्शीत झाल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. काही दिवसापुर्वीच समांतर २ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सगळीकडे संमातर या वेब सीरीजची चर्चा सुरु आहे. मात्र औरंगाबादमध्ये या चर्चेला वेगळेच वळण लागले आहे. ट्विटरवर इडलीवाला आण्णा या नावाच्या युजरने एक भन्नाट ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांने लिहीले आहे की, ‘स्वप्नील जोशीच्या दोन समांतर वेबसिरीज आल्या, पण १५ वर्षांत औरंगाबादला ‘समांतर’ काय आलीच नाही. आठ दिवसाला एकदा पाणी येतं नळाला, पण नागरिक कोण काही आवाज काढत नाहीत.’ अशा प्रकारे या युजरने ‘समांतर’ वेब सिरीजचा संबध औरंगाबादमधील ‘संमातर जलवाहिनी’शी जोडला आहे.
स्वप्नील जोशीच्या दोन समांतर वेबसिरीज आल्या, पण १५ वर्षांत औरंगाबादला "समांतर" काय आलीच नाही. आठ दिवसाला एकदा पाणी येतं नळाला, पण नागरिक कोण काही आवाज काढत नाहीत. #औरंगाबाद #aurangabad #संभाजीनगर pic.twitter.com/kFTP63ZHkp
— इडलीवाला अण्णा (@ashutoshab) July 7, 2021
या पोस्ट वर एकाने कमेंट करुन समांतरचा एक भाग इथे शुट व्हायला पाहिजे असे सुचवले. तर त्यावर प्रतिक्रिया देताना एकाने समांतर ३ मध्ये स्वप्नील जोशीला पाण्याची वाट बघताना दाखवायला हवे असे सुचवले. गेल्या १५ वर्षापासुन औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी समांतर जलवाहीनीचा प्रकल्प आणला होता. या प्रकल्पाला १५ वर्षे होत आली तरीही हा प्रकल्प मार्गी लागत नाही.
मी तर म्हणतो स्वप्नील जोशी चा समांतर ३ मध्ये त्याला पाण्याची वाट बघत बसलेला दाखवायला पाहिजे
— इडलीवाला अण्णा (@ashutoshab) July 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- HDFC बँकवर नॅशनल हाऊसिंग बँकेने केली मोठी कारवाई
- ‘भास्कर जाधव हे नरकासुरा सारखे आहेत’, नितेश राणेंचा प्रहार
- ‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

