🕒 1 min read
सातारा: राज्य सरकारच्या वाईनविक्री निर्णयाविरोधात काल (३ फेब्रुवारी) ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (senior kirtankar Bandatatya Karadkar) यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde)आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांची नावे घेतली. याविरोधात आता बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीर आंदोलन , कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन तसेच भडकाऊ भाषण केल्याच्या कारणाने त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?
बंडातात्या कराडकर यांनी म्हटले होते की, नेत्यांचीही मुले दारुच्या आहारी गेली आहेत. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यादेखील दारु पितात, असा उल्लेख करत कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा. असा सवाल त्यांनी केला. तसेच आपण ज्यांची नावे घेतली आहेत याबाबत आपल्याकडे पुरावादेखील असल्याचे म्हटले होते. तसेच सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही बंडातात्या कराडकर यांनी दिले होते.
बंडातात्या कराडकरांचा माफीनामा-
दरम्यान हे प्रकरण वाढल्यानंतर बंडातात्या कराडकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माफी मागितली आहे. ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे पोवळा तर अजित पवार ढोवळा-
दरम्यान बंडातात्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला होता.
ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले. तसेच अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला असून त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं असल्याचा आरोपही बंडातात्या यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या:
- ‘उत्तर प्रदेशमध्ये बहुमताने सरकार स्थापन करेल’; अमित शाहांचे वक्तव्य
- वाईनवरून शेतकऱ्यांची बदनामी थांबवा- राजू शेट्टींचे वक्तव्य
- रूपाली पाटील-ठोंबरे यांची वैचारिक पातळी काय ? – श्वेता महाले
- १० फेब्रुवारी पासून सुरु होणार भारतातील बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा…
- ‘राहुल गांधींना दोन भारत दिसतात कारण त्यांची आई…’; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
