पुणे : बॉलीवुड अभिनेत्री पायल रोहतगी ही नेमही तिच्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असते. काही दिवसापुर्वी सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलांना हातपाय मोडण्याची धमकी दिल्यामुळे तिला अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पायलच्या अडचणीत वाढ झाली आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीननगर पोलीस ठाण्यात पायल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायलने शेअर केलेल्या शेअर केलल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तिने राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार केला आहे. यामुळे पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
तसेच पायलने शेअर केलेल्या या व्हिडिओ हिंदु -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला. त्यातून हिंदु -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
यापूर्वी देखील पायलने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवल्यामुळे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने असे कृत्य केल्याने तिच्यावर आता काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘मंदिरे उघडलीच पाहिजे अन्यथा..’, राज ठाकरेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

