सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
कालच्या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘शिवसेना नेहमी चांगल्या कामाला विरोध करतेय. आधी कॉलेज मग एअरपोर्ट चांगल्या प्रोजेक्टला विरोध करायचा, नंतर उदघाटन वेळी यायचं, याला म्हणतात आयत्या बिळावर शिवसेना’, असे म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली होती.
यावर शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी भाष्य केले आहे. “अमित शहा यांनी नारायण राणेंना कितीही बळ पुरवले तरी ते शिवसेनेला घाबरून मैदान सोडून पळ काढणार नाहीत, याची खातरजमा अमित शहा यांनी करून घ्यावी असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे. तसेच राणेंना कितीही ताकद दिली तरी पुढच्या निवडणुकीत शिवसेना त्यांना पुन्हा एकदा पराभूत करून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.
अमित शहा यांनी काल केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध भाजपा वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. अमित शहा यांनी शिवसेनेवर टीका करत नारायण राणे यांना बळ आणि योग्य सन्मान देण्याचे सूचक विधान केल्यानंतर आता शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंना पराभवाचा धक्का देत सिंधुदुर्गमधील कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवणाऱ्या वैभव नाईक यांनी आता नारायण राणे आणि भाजपाला जोरदार आव्हान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुढच्या निवडणुकीत दानवेंना घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही’
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- ‘अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे’
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- ‘शी जिनपिंगच्या शरीरात डेमोक्रॅटिकमधला ‘डी’ सुद्धा नाही’ भारतासाठी जो बायडन यांचे विधान महत्वाचे !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

