Share

भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील अन्नदाता गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी बसला आहे. या आंदोलनाची धग देशभरात पोहचत असताना प्रजासत्ताक दिनी झालेल्या गोंधळानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनेचा सर्वच राजकीय नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी निषेध केला असला तरी आता आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगत असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली वेळी झालेल्या घटनेच्या पाठीशी भाजपचाच हात असल्याची टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी एबीपी माझा ला प्रतिक्रिया दिली आहे.

‘ गेले दोन महिने हे आंदोलन शांतपणे सुरु होते. देशभरातून या आंदोलनाला सहानभूती देखील मिळत होती. मात्र आता सिंघू बॉर्डरवर पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय. सरकारला बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना उखडून टाकायचं आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी जी परिस्थिती चिघळली तो पूर्वनियोजित कट होता. हे काम नक्कीच सरकारचं आहे, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे हे भाजपवलेच होते हे व्हिडिओतून समोर आलं आहे’ असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!