Share

रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून १७ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

Published On: 

लातूर: “तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे..”, असे म्हणत वाईट हेतूने तिचा रोज पाठलाग करायचा, पण एकदिवस त्याच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून शेवटी तिने आत्महत्या केली. ही घटना लातूर येथील चाकूर जवळील तळणी या ठिकाणी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तळणी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला ईश्वर कन्हेरे हा रोज त्याच्या महाविद्यालयातील एका १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करायचा. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस, माझ्याशी बोलत जा, असं म्हणत तो तिचा नेहमी पाठलाग करायचा. एकेदिवशी त्या तरुणीच्या वडिलांनी राहुल गायकवाड यांनी त्या रोड रोमिओला चांगलंच झापलं होतं. मुलीला त्रास न देण्याबद्दल त्यांनी त्याला समज दिली, पण तरी त्याने काही ऐकले नाही, मी काहीही करेन, तुमचं तुम्ही बघा, असे म्हणून ईश्वर तिथून निघून गेला. पण पुन्हा एकदा तरुणीच्या वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ईश्वरने त्यांना धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकाराने व्यथित झालेल्या तरुणीने अखेर पहाटे गळफास लाऊन आत्महत्या केली.

या घटनेनंतर राहुल गायकवाड यांनी ईश्वर याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यावरून ईश्वर कन्हेरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी विद्यानंद काळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!