Share

ड्रिम मॉलमधील आगप्रकरणी रुग्णालयच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल होणार

Published On: 

मुंबई : मुंबईतील भांडूप मधील ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात काल रात्री बाराच्या सुमारास आग लागली. या मॉलमध्ये सनराईझ रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते.

सनराईस रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आग अत्यंत भीषण असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी ११ तास लागले. या आगीत दहा जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यात दोन कोरोना रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस हॉस्पिटलला लागलेल्या आगीची पाहणी केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सनराईस हॉस्पिटलला लागलेली आग अत्यंत भीषण आहे.

निष्काळजीपणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच आगीला रुग्णालयातील कोण कोण जबाबदार आहेत, त्याचा तपास करण्यात येणार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नगराळे यांनी सांगितलं.

या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!