Share

पतीचे विवाहबाह्य संबंध; प्रेयसीवर गुन्हा दाखल

Published On: 

जालना: पतीचे विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होत होता, त्यामुळे पत्नीने पोलिसांत तक्रार करत पती तसेच त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला त्याच सोबत सासू-सासऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही घटना जालना जिल्ह्याच्या परतूर येथे घडली आहे.

परतूर तालुक्यातील मापेगाव (खुर्द) हे माहेर असलेल्या एका विवाहितेचे लग्न २०१९ मध्ये नाशिक येथील किरण खंडू सापते या हिंदू मुलाशी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नानंतर एक-दोन महिने चांगले नांदवल्यावर, नवरा आपल्याला चांगले वागवत नाही, असे तिच्या लक्षात आले. तेव्हापासून तिने त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. पतीच्या परिचयातील असलेल्या एका महिलेशी त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

पतीचे असलेले विवाहबाह्य संबंध लक्षात आल्यावर तिने पतीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही, उलट पीडित महिलेला “तुला राहायचे असेल तर राहा, नाही तर निघून जा” असे सांगितले. शेवटी या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पती, पतीची प्रेयसी आणि सासरच्या मंडळींविरुद्ध परतूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!