Share

बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविडसेंटर सुरू करण्यात कुणाचा फायदा होता? मनसेने डागली सरकारवर तोफ

Published On: 

मुंबई : मुंबईतील भांडूप मधील ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात काल रात्री बाराच्या सुमारास आग लागली. या मॉलमध्ये सनराईझ रुग्णालय चालवले जात होते. या रुग्णालयात काही कोरोना रुग्णांवर उपचार देखील सुरु होते. दरम्यान, सुरुवातीला पहिल्या मजल्याला लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले.

सनराईज हे रुग्णालय देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत दहा जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यात दोन कोरोना रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सध्या मिळत आहे. आग अत्यंत भीषण असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी ११ तास लागले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णांना बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, काहीच महिन्यांपूर्वी भंडारा रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे चिमुकल्यांना प्राण गमवावा लागला होता. पुन्हा एकदा रुग्णालयाला आग लागल्याने रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मॉलमध्ये रुग्णलाय सुरु करताना आवश्यक सुविधांची तपासणी का गेली गेली नाही ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

मनसेनं सरकारवर निशाणा साधला आहे.बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविडसेंटर सुरू करण्यात कुणाचा फायदा होता?, असा सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे. तसेच कोरोनाच्या काळात पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाला परवानगी दिली होती का, असा सवाल त्यांनी विचारला. स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. प्रशासन फक्त नावाला चौकशी करते, पुढे काहीच येत नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!