Share

दरवर्षी श्रावण-भाद्रपदात अर्थव्यवस्थेत मंदी येते : मोदी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आल्याचे चित्र आहे. भारताचा विकासदर हा गेल्या आठ वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ५ टक्के इतका आहे. त्यामुळे योग्य पावले न उचलल्यास भारतात मंदी येण्याची शक्यता आहे.

यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्थेच्या चक्रानुसार श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतेच. मात्र, यावेळी काही राजकीय पक्ष त्याचा मोठा गवगवा करत आहेत. निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर या पक्षांना नैराश्य आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार सुरु असल्याची टीका सुशीलकुमार मोदी यांनी केली.

तसेच पुढे बोलताना मोदी यांनी याची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे कारण केंद्र सरकारने यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत. लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील, असं विश्वास व्यक्त केला आहे. तसेच या आर्थिक मंदीचा बिहारवर कोणताही परिणाम झाला नाही असंही मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ मनमोहनसिंह यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीकडे चालला आहे असं विधान केले आहे. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका आज देशाला बसत आहे. नोटबंदी आणि जीएसटी यासारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!