टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
या सर्व प्रकरणावर भाष्य करताना एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करुन घेतो. पक्षात आलेल्यांना क्लीन चिट दिली जाते, त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात. मात्र भाजपमध्ये येणारे साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब मिळावी यासाठी हे सगळे येत आहेत. भाजपची नीती मूल्य मान्य म्हणून सर्व येत आहेत असं नाही. पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्यावं लागतं. मात्र चांगल्या लोकांची व्याख्या ठरवत असताना, दुमत होऊ शकतं
तसेच पुढे बोलताना खडसे यांनी ‘नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, असं अनेक वर्षांपासून ऐकतोय. प्रत्येक पक्षाने कोणाला पक्षात घ्यावं, हा अधिकार त्या पक्षाला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनाचा दबाव घेऊ नये’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच या निवडणुकीत शिवसेनेसोबतच्या युतीचा फायदा होईल असंही विधान केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि भाजपला धक्के बसत आहेत. आजही राणा जगजीतसिंह पाटील, पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार बबन शिंदे, जयकुमार गोरे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, रामराजे नाईक यांचा अमित शहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.
- ‘जिना यहां, मरना यहां’; जिवंत आहे तोपर्यंत भाजपचे काम करणार
- राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी खासदाराने दिली भाजप प्रवेशाची कबुली
- ‘पराभवाच्या छायेत असल्यानेच राष्ट्रवादीला आली छ.शिवाजी महाराजांची आठवण’
- राष्ट्रवादीला अजून एक धक्का; ‘या’ माजी आमदाराने सोडली पवारांची साथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
