🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जनसंपर्क साधण्यासाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेतील दुसऱ्या टप्प्याची सांगता रविवारी सोलापुरात झाली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही नेतेमंडळी उपस्थित होती.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पाटील यांनी ‘आज आघाडीच्या तिघांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार पत्रकार परिषदेत पत्रकारावर उखडले. त्यांना त्यांची जवळची माणसं निघून जात असल्याने त्यांच्या मनाचा तिळपापड आणि त्रागा झाल्याचं दिसून येत आहे, तसेच आम्ही पोरं पळवणारी टोळी नाही, कारण पक्षात प्रवेश केलेले पोरं नाहीत, असं विधान पाटील यांनी केले ते म्हणाले.
महाजनादेश यात्रेविषयी बोलताना पाटील यांनी ‘ज्यांनी आम्हाला मतदान केलं, त्यांचे आभार मानण्यासाठी ही रॅली, त्यांना हिशोब देण्यासाठी ही रॅली आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही रॅली आहे असं विधान करताना विरोधक जातीचं राजकारण करतात अशी टीकाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर केली. त्यामुळे विरोधकांकडून या टीकेला कसं उत्तर मिळणार हे पाहन महत्वाच ठरणार आहे.
दरम्यान, अमित शाहांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच येत्या काही दिवसांत इतरही अनेक नेते भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत.
- राणेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी घेतली ‘ही’ भूमिका, म्हणाले…
- १३ तारखेला लागणार विधानसभेची आचारसंहिता, रावसाहेब दानवेंच भाकीत
- …तर शरद पवारांची राष्ट्रवादी दिसणार नाही : शाह
- नारायण राणेंसाठी उद्धव ठाकरेंची समजूत काढू-चंद्रकांत पाटील

