Share

मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला RSSसाठी 50 कोटी रुपये दिले जातात : नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. भाजप , शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षांनी तर यात्रांच आयोजन करून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसने देखील पुढचं पाऊल टाकत सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी महापर्दाफाश यात्रा काढली आहे. अमरावतीतून या यात्रेला सुरुवात होताचं कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. तर मंत्री गिरीश महाजन यांना ‘जोकरमंत्री’ची उपमा दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला 50 कोटी रुपये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीत टेंडर न काढता कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. 5 वर्षात ओबीसींची शिष्यवृत्ती थांबवली. तर हे सरकार sc, st, obc विरोधी असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरावरून नाना पटोले यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापूरवर पुराची स्थिती ओढवली. गिरीश महाजन हे जोकरमंत्री आहेत.’ अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीला नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातूनच महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर आता काँग्रेसच्या वतीने आजपासून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वात ‘महापर्दाफाश’ यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेतून कॉंग्रेस पक्ष जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!