टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या आणि भोपाळच्या खा. साध्वी प्रज्ञासिंह पुन्हा एकदा बरळल्या आहेत. विरोधकांच्या वाईट शक्तीच्या प्रयोगामुळेचं भाजपचे तीन ज्येष्ठ नेते दगावले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर या वाईट शक्तीच्या प्रयोगाबाबत मला एका महाराजांनी सांगितल होत असं देखील म्हणाल्या आहेत. भोपाळच्या प्रदेश भाजप कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि एमपीचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या निधनामुळे शोकसभा ठेवण्यात आली होती. यावेळी खा. साध्वी बोलत होत्या.
यावेळी साध्वी म्हणाल्या की, जेव्हा मी लोकसभा निवडणूक लढवत होते. तेव्हा मला एक महाराज भेटले. ‘विरोधीपक्षातील नेते तुमच्या पक्षातील नेत्यांवर वाईट शक्तिचा प्रयोग करत आहेत. त्यामुळे तुम्ही सावध रहा. हा निर्वाणीचा इशारा मला महाराजांनी दिला आणि त्यानंतर मी मधल्या काळात तो विसरलेही. मात्र आज मला महाराजांनी सांगितलेली गोष्ट लख्ख आठवली. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ पण महाराजांनी सांगितलेलं आज खरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान काही महिनाच्या अंतरावरचं भाजपने दोन ज्येष्ठ नेत्यांना गमावले आहे. आधी सुषमा स्वराज आणि आता अरुण जेटली यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे भाजपला धक्का बसला आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या जडणघडणीच्या काळापासून पक्षाशी जोडलेले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू भाजप नेत्यांना अनपेक्षित होता. मात्र यावर खा. साध्वी यांनी मुक्ताफळे उधळी आहेत. या दोन नेत्यांच्या मृत्यूला विरोधकचं जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
- #पक्षांतर : राष्ट्रवादीचा ‘हा’ मातब्बर नेता भाजपच्या गळाला, मोदींच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता
- धनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का? : बाळराजे पाटील
- राष्ट्रवादीला धक्यावर धक्का ; उल्हासनगरच्या आमदार ज्योती कालानीही भाजपच्या वाटेवर?
- मुख्यमंत्री बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास का घाबरतात ? : जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
