🕒 1 min read
मुंबई – सांगली कोल्हापूर परिसरात आलेल्या महापुरामुळे अनेक जणांचे जीव गेले. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज दि. 10 ऑगस्ट रोजी सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्यांचा आजचा नियोजित परभणी आणि बीड जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आला असून बीड आणि मुंबईतील सत्काराचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रामदास आठवले यांनी जाहीर केली.
आज रामदास आठवले हे आधी ठरविल्याप्रमाणे परभणी आणि बीडचा दौरा करणार होते. बीड येथे त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र सांगली कोल्हापूर येथे महापुरामुळे झालेल्या दुर्घटनेमुळे बीड चा सत्कार आणि येत्या दि. 14 ऑगस्ट रोजी मुंबईत नियोजित करण्यात आलेला सत्कार रद्द करण्यात आला असल्याचे अधिकृत घोषणारामदास आठवले यांनी काल मुंबईत केली.
रामदास आठवले सांगली आणि कोल्हापूर चा दौरा करणार असून रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज केले आहे.
दरम्यान, ही पूरस्थिती नियंत्रित करण्यास सरकारला अपयश आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा अशीही मागणी होत आहे. सरकारकडून मात्र पूरग्रस्तांना शक्य ती मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच काही सामाजिक संस्थाही पूरग्रस्तांसाठी धावून आल्या आहेत.
शरद पवार, धनंजय मुंडे आज पूरग्रस्त सांगली-सातारा भागाचा दौरा करणार
‘एक हात मदतीचा’ उपक्रम : पूरग्रस्तांसाठी आमदार लांडगे यांनी जपली ‘माणुसकी’!
कलम ३७० हटवण्यामागे अमेरिकेचा हात; प्रकाश आंबेडकरांचा जावईशोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

