Share

कलम ३७० हटवण्यामागे अमेरिकेचा हात; प्रकाश आंबेडकरांचा जावईशोध

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेनंतर लोकसभेतही जम्मू काश्मीरविषयीचे बहुचर्चित कलम ३७० मंजूर झाले आहे. हे विधेयक ३७० विरुद्ध ७० मतांनी मंजूर झाले. सरकारच्या या निर्णयामुळे सगळीकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी यावरून एक नवीन शोध लावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी कलम ३७० हटवण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचं म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याचा निर्णय अतिशय घाईत घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यास, घटनेनुसार विदर्भ प्रांताला मिळालेला विशेष अधिकार आणि अन्य काही राज्यांना असलेला विशेष दर्जा धोक्यात येऊ शकतो असं विधान आंबेडकर यांनी केले आहे.

तसेच पुढे बोलताना आंबेडकर यांनी ‘काश्मीरबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयाने केंद्राच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यास विदर्भाला विशेष फरक पडणार नाही. मात्र, अरुणाचलप्रदेश, मेघालय, आसाम, मिझोराम राज्यांचा विशेष दर्जा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही विधान केले.

दरम्यान, आंबेडकर यांनी राज्य सरकारवरही टीका केली. त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही मंत्रिमंडळातील सदस्यांनी मुंबईत राहण्याऐवजी मोझरीत ठाण मांडले. जनतेच्या जीवापेक्षा भाजपचा कार्यक्रम मोठा अशा शब्दात भाजपवर टीका केली.

#Article370 : शरद पवारांना आला मुफ्ती आणि अब्दुल्लांचा पुळका

कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानने भारतातील उच्चायुक्तांनाही माघारी बोलावले

बहिणींना माहेरच्या आधाराची गरज, चला सगळे मिळून संसार उभा करूया : जितेंद्र आव्हाड

‘पाच वर्षे कामे केली असती तर तुम्हाला यात्रा काढावी लागली नसती’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!