टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत करणार आहेत. या भेटीत त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हेही असणार आहेत.
शरद पवार हे आज सकाळी ९ वाजता ते तांबावणे ता.फलटण, जि.सातारा येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता पलुस, ता.जि.सांगली येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेवुन त्यांना दिलासा देणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ते सांगली येथील पुरग्रस्त व कॅम्पला ही भेट देणार आहेत.
दरम्यान, ही पूरस्थिती नियंत्रित करण्यास सरकारला अपयश आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा अशीही मागणी होत आहे. सरकारकडून मात्र पूरग्रस्तांना शक्य ती मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच काही सामाजिक संस्थाही पूरग्रस्तांसाठी धावून आल्या आहेत.
बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पूरग्रस्त भागात २८ टीम कार्यरत – सुभाष देशमुख
महाजनांची सेल्फी म्हणजे ‘निर्लज्जम सदासुखी आणि निर्लज्जपणाचा कळस’ : तृप्ती देसाई
जुने सरकार ७ दिवस घर पाण्यात गेले तरचं मदत द्यायचं : आशिष शेलार
आता काय माणसांचा जीव गेल्यावर सांगतो का ? अजित पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

