🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
अशातच राज्य सरकारने पुरात अडकलेल्या लोकांसाठी अजब निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरच गहू आणि तांदूळ मिळणार असल्याचा अजब निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होताना दिसत आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘या पूरग्रस्त भागाला शासकीय मदत करण्यासाठी एक नियम आडवा येतोय. कुटुंबातील सर्व वस्तू वाहून गेल्या असूनही मदतीसाठी नियमात बसणं गरजेचं आहे. सलग दोन दिवस घरात पुराचं पाणी असेल, तरच शासकीय मदत मिळते असा नियम आहे. ही अट काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या काळात सात दिवसांची होती, जी दोन दिवसांवर आणली, अशी माहिती शेलार यांनी दिली आहे.
30 जानेवारी 2014च्या जीआरमध्ये तुम्ही सात दिवस बुडिताचा नियम टाकला होता. तुम्ही कोणते कामच केले नाही, तर तुमचेच जीआर तुमच्या लक्षात राहणार तरी कसे?@NCPspeaks @INCMaharashtra #MaharashtraFloods pic.twitter.com/Qq6NHypagW
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 9, 2019
दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. NDRF चे जवान पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवत आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थाही पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यामुळे या भागात बचावकार्य सुरु आहे.
कोल्हापुरकरांना दिलासा, पंचगंगेच्या पाणीपातळीत घट
राज्य सरकारच्या आलमट्टी धरणांतून पाणी सोडण्याच्या प्रस्तावाला कर्नाटक सरकारचा कानाडोळा
#कोल्हापूर – सांगली महापूर : ढेपाळलेल्या यंत्रणेवरून संतप्त नागरिकांनी महाजनांना विचारला जाब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

