Share

धोनीला सामना सुरु होण्यापूर्वीच होती पराभवाची कल्पना, मॅचनंतर म्हणाला…

Published On: 

अबुधाबी : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या लढतीमध्ये राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 7 विकेट्सनं पराभव केला. आयपीएल 2021 हंगामात शनिवारी डबल हेडरचा रोमांच रंगला. या दिवसातील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 17.3 षटकात 3 बाद 190 धावा करत चेन्नईवर दमदार विजय मिळविला.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली, पण डू प्लेसिस 7व्या षटकात 25 धावांवर बाद झाला.त्यानंतर फलंदाजीला आलेला सुरेश रैना नेहमीप्रमाणे फ्लॉप ठरला. यानंतर मोईन अलीने ऋतुराजला चांगली साथ दिली. ऋतुराज आणि मोईन अलीची जोडी मैदानावर जमली असतानाच मोईन 21 धावांवर बाद झाला. त्यामुळे चेन्नईच्या 15 षटकांत 3 बाद 116 धावा झाल्या. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार खेचत नाबाद 101 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने नाबाद 32 धावा करत त्याला सुरेख साथ दिल्याने 20 षटकांत 4 बाद 189 धावा उभारल्या.

दरम्यान, या पराभवाची भनक धोनीला अगोदरच लागली होती. धोनीने खुद्द स्वतःच याचा खुलासा केला आहे. सामन्यानंतर धोनीने ‘या सामन्यातील नाणेफेक गमावणं सर्वात वाईट होते’, अशी प्रतिक्रिया दिली. नाणेफेक गमावल्यानंतर कदाचित धोनीला अंदाज आला होता हा सामना हातून गमावण्याची, म्हणून सामन्यानंतर धोनीने  नाणेफेक गमावणं सर्वात वाईट असल्याची प्रतिक्रिया दिली.

धोनी म्हणाला, ‘या पीचवर पहिल्यांदा बॅटिंग करताना आम्ही 250 सर्वाधिक धावा करायला हव्या होत्या. राजस्थानच्या बॅटिंगवेळी पीचवर दव होतं त्यामुळे बॉल बॅटवर चांगल्या प्रकारे येत होता. त्यामुळे राजस्थानच्या फलंदाजांना मोठा फायदा झाला. परंतु या बॅटिंगचं क्रेडिट मी पूर्णपणे राजस्थानच्या फलंदाजांना देऊ इच्छितो. सुरुवातीला बॉल थांबून येत होता, स्कीट होत नव्हता’, धोनीने मॅच संपल्यानंतर पिचचचे बारकावे सांगितले. तसंच टॉस गमावण्याचे तोटेही सांगितले. पुढे बोलताना धोनीने मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीचेही कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!