🕒 1 min read
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
ठाकरे सरकार बेकायदेशीररित्या अटक करण्याचा डाव आखत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. तर कोल्हापूरमध्ये जाण्यावर सोमय्या हे ठाम असून महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरमध्ये उद्या दाखल होणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीसह हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी देखील सोमय्या यांना विरोध करण्यासाठी जय्यत तयारी केली असून मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पोलिसांनी सोमय्या यांना केलेल्या स्थानबद्धतेचा भाजपने तीव्र निषेध केला आहे.
if the Gov has detained @KiritSomaiya ji means his info is right!
Whatever he is sayin is the truth!
We r with u Kirit ji!!
Lage raho..
Aur inki bajate raho!!!— Nitesh Rane (@NiteshNRane) September 19, 2021
भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील यावर ट्विट करून भाष्य केलं आहे. ‘जर सरकारने सोमय्या यांना ताब्यात घेत असेल तर त्यांची माहिती योग्य आहे. ते जे काही बोलत आहेत ते खरं आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत किरीट जी, लगे रहो और इनकी बजाते रहो,’ असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- महामारीची भैरवी झाली; आता नाटकाच्या नांदीसाठी कान आतूर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
