चंडीगड – पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंगआणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद पाहायला मिळत होता. पक्ष श्रेष्ठींनी मध्यस्थी करून देखील सिद्धू हे खोड्या काढत असल्याचे दिसत होते यामुळेच वैतागून अखेर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे.
यातच सिद्धू समर्थक 40 आमदारांनी चिठ्ठी लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता आज या आमदारांची बैठक होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या सेक्टर 15 येथील काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत आहे मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना फोन करून असे अपमान सहन करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी या इशाऱ्याला फारसे गांभीर्याने न घेतल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान अन् आज जयंत पाटील आणि फडणवीस एकाच गाडीत
- राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, काहीही चमत्कार होऊ शकतो – विखे
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नेतृत्वाच्या बदलाच्या चर्चांना आले उधाण
- ‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान बीकेसीतील पूल दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी दिले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
