औरंगाबाद: महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सुचनेनुसार सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात आयोजित कोरोना लसीकरण अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिल्लोड शहर व ग्रामीण भागात नागरिकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत लसीकरण करून घेतले. लसीकरणाची ही मोहीम सुरूच राहणार असून येत्या १५ दिवसांत मतदारसंघात १०० टक्के लसीकरण करण्याचा निर्धार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
बजाज ग्रुपच्या सहकार्याने या अभियानासाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुरुवारी ( दि.२) रोजी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शहरातील नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी, आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस घ्यावी असे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लसीकरण अभियान उदघाटन प्रसंगी केले.
आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याने कोणीही लसीकरणा पासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. दरम्यान एका मार्मिक कथेचे उदाहरण देत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोना सलीचे महत्व पटवून दिले. भविष्यातील धोका पाहता आजच जर लस घेतली नाही तर येत्या काळात पश्चताप होईल. कोरोना लस घेतलेली नसल्यास प्रवास करता येणार नाही तसेच लस न घेतलेल्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते असे सत्तार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…म्हणजे सीबीआयचा तो अहवाल खरा आहे’; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
- कोरोना स्थिती मागील वेळी पेक्षा आटोक्यात; श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणेशोत्सवाबाबत ट्रस्टने घेतला ‘हा’ निर्णय
- शिवसेनेचा ‘राज्यमंत्री’ असूनही शहर प्रमुखांचा न्यायासाठी लढा!
- शॉपींग कॉम्प्लेक्सला अडथळा! सिद्धार्थ उद्यानाचे जुने ऐतिहासिक ठेवणीचे प्रवेशद्वार पाडले
- ‘तुम्ही पडद्याआडून पाहात प्रेम का करत आहात?’ ओवेसींचा पंतप्रधान मोदींना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
